आश्वासीत प्रलंबीत मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ जुक्टो शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळणार

0

अमळनेर (प्रतिनिधी):-कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे वेळोवेळी आंदोलनाचे विविध आयुध वापरून देखील राज्यशासनातर्फे आश्वासीत विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात न आल्याने राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षक दिन काळा दिवस म्हणून काळ्या फिती लावून पाळणार आहेत.

अमळनेर जुक्टो देखील आंदोलनात सहभागी असल्याने उपरोक्त आशयाचे निवेदन महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटनेतर्फे अमळनेर येथील  निवासी नायब तहसीलदार श्री. योगेश पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील,ज्युक्टो अध्यक्ष प्रा.डी.व्ही. भलकार,प्रताप कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे, प्रा.किरण पाटील, प्रा.दिनेश बोरसे इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.