…तर पाच दिवसात पक्ष सोडणार; खडसेंचा भाजपला इशारा

0

जळगाव :  भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार, असा इशारा भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  दिला आहे.  विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा देतानाच आपल्याला इतर तिन्ही प्रमुख पक्षांकडून निमंत्रण आल्याचंही सांगितलं आहे.त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या अल्टिमेटनंतर भाजप हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे

दरम्यान मागील मोठ्या कालावधीपासून एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. वेळोवेळी त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, थेट पक्षाला इशारा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकनाथ खडसे काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.