तरी भाजपच्या नेत्यांचा अहंपणा गेला नाही ; एकनाथराव खडसेंचा टोला

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची संवाद यात्रा निमित्त नियोजनाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालायात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच ज्या अहंमपणामूळे राज्यातील भाजपची सत्ता गेली, तरी त्या नेत्यांमधील अजून ही अहंपणा गेलेला दिसत नाही.  भाजपा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असलेले कार्यकर्ते, नेते यांना थांबविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, तुम्हाला या, त्या समितीवर घेणार, असे कारणे सांगून थांबवण्याचा प्रयत्न या नेत्यांना करावा लागत आहे. परंतू राज्यातील महाविकास आघाडी सरकार विकासाच्या कामांमधून पायरोवत आहे, असे ते म्हणाले

यावेळी एकनाथराव खडसे मार्गदर्शन करतांना म्हणाले, की जयंत पाटील यांचा जळगाव दौरा असून त्यांना जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवायची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजूटीने , एकनिष्टेने काम करायचे आहे. राष्ट्रवादीपक्ष हा तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करायचा आहे. जिल्हायातील भाजपचे अनेक जण राष्ट्रवादीत येण्यास ईच्छूक असून त्यांचा प्रवेशाबाबत नियोजन लवकरच केले जाणार असल्याचे माहिती खडसेंनी दिली.

मी पून्हा येईल, मी पून्हा येईल

भाजप नेत्यांवर खडसेंनी पून्हा त्यांच्या शैलीत हल्ला चढवीत भाजप नेत्यांवर आपले कार्यकर्ते आपल्या सोडून जाऊ नये यासाठी भाजपचे सरकार पून्हा येणार, महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे म्हणून वेळ काढायची आहे. परंतू महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण काळ चालणार आणि भाजप नेत्यांवर निवडणूकीच्या वेळी मी पून्हा येईल, मी पून्हा येईल असे म्हणण्याची वेळ येणार अशी टिका करून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दीक टोला लगावीला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.