जिल्ह्यात दिवसभरात ४२ नवे बाधित रुग्णांची नोंद

0

जळगाव । जिल्ह्यात आज ४२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय.

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५७ हजार १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ४६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३४९ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे.  जिल्ह्यातील मृत्यू संख्या १ हजार ३५९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-१३, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-०३, अमळनेर-००, चोपडा-१६, पाचोरा-०१, भडगाव-०, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा -००, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.