तरवाडे शिवारातून बैल जोडी चोरली

0

चाळीसगाव ;-तालुक्यातील तरवाडे शिवारातून अज्ञात चोरट्यांनी एक बैल जोडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,बापू ज्योतीराम शिंदे व 48 राहणार तरवाडे तालुका चाळीसगाव हे शेती व्यवसाय करीत असून त्यांचे तरवाडे शिवारात शेत असून त्यांच्या तरवाडे शिवारातील शेतात बांधलेल्या 16 हजार रुपये किमतीचा गावरान जातीचा बैल आणि 14 हजार रुपये किमतीचा गावरान जातीचा बैल असे एकूण 30 हजार रुपये किमतीचे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी सात ऑगस्ट 2023 च्या रात्री दहा ते आठ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरून नेले. याप्रकरणी बापू शिंदे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आठ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार विजय शिंदे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.