तमिळनाडूमध्ये खासगी बस लॉरीवर धडकली ; २० ठार, २४ जखमी

0

अविनाशी : तमिळनाडूमधील अविनाशी नजीक आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास खासगी बस आणि लॉरीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरुहून ही खासगी बस कोचीसाठी निघाली होती. प्रवाशांनी भरलेली बस भरधाव वेगात असतानाच गुरुवारी पहाटेच्या सुमारास लॉरीवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की खासगी बसचा पुढचा भाग पूर्ण लॉरीखाली गेला. या अपघातामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. पोलिसांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशा मुळे झाला? बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला का? या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.