बोदवड येथे तंबाखू मुक्तीसाठी शालेय भेटी व आढावा बैठक संपन्न

0

बोदवड (प्रतिनिधी) – शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व समाल मुंबई फाउंडेशन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जनमानवता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने तंबाखू मुक्त शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे.यात बोदवड तालुका अव्वल स्थानी आहे.

बोदवड तालुका तंबाखू मुक्त होण्याच्या दृष्टीकोनातून नुकतीच तालुक्यातील शाळा भेटी अभियान तथा गटसाधन केंद्र बोदवड येथे मुख्याध्यापकांनी आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती सदस्य राजमोहम्मद शिकलकर (चोपडा) ते अध्यक्षस्थानी होते.पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी भास्कर लहासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी शहरातील जि.प.उर्दू मुलांची शाळा,व शर्ती.रेणुकादेवी माध्यमिक विद्यालयाला भेटी देण्यात आल्या.

यावेळी मुख्याध्यापकांना तांत्रिक माहिती भरणे बाबत तालुका तंबाखू मुक्ती समिती समन्वयक  सुभाष मराठे व अजय वाघोदे यांनी मार्गदर्शन करीत तंबाखूमुक्तीची पुस्तके ही यावेळी वाटण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ यांची समितीच्या सदस्यांनी भेट घेतली.यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मुख्याध्यापकांनी तालुका लवकरात लवकर तंबाखू मुक्त करण्याच्या निर्धार केला तर आभार सुभाष मराठे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.