भुसावळातील काबरा मेडिकल चोरांनी फोडले

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील हंबर्डीकर चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेले  काबरा मेडिकल दुकान रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडल्याने परिसरात भीती पसरली आहे.

शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दुकान फोडल्याची महिन्यातील ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी शांती नगर भागात आठ दुकाने फोडण्यात आली होती.त्या पाठोपाठ ही दुसरी घटना दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी काबरा मेडिकल फोडून रोख 2,500 रुपये व चांदीची तीन पूजेसाठी ठेवलेली नाणी घेऊन पसारा झाले.ही घटना अवघ्या 12 मिनिटात घडल्याची माहिती दुकान मालकांनी दिली.पेट्रोलींग करणारे पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी गेले व काही मिनिटात परत येऊन आपले वाहन काबरा मेडिकलच्या समोर हॉटेल जवळ लावले असता त्यांना काबरा मेडिकल दुकानाचे  अर्ध शटर उघडे दिसताच सर्व पोलीस कर्मचारी मेडिकलच्या बाहेर येऊन थांबले व दुकान मालक राजेश चांदमल काबरा यांना मेडिकल फोडल्याबाबत माहिती दिली.याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती दुकान मालक यांनी दिली.

शहरातील सी.सी.टीव्ही कॅमेरे मेंटनन्स करण्याचे  काम नगर परिषदेचे आहे.पण नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील सर्व कॅमेरे बंद स्थितीत असल्याने चोरट्यांचे चांगलेच भागत आहे.नगर परिषदेने लवकरात-लवकर सी.सी.टीव्ही कॅमेरे शहरातील सुरू करण्याची मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.