तब्बल ४२ लाखांचा गुटखा जप्त; २ जण अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मालेगाव येथून चाळीसगावमार्गे जळगावला येणाऱ्या ट्रकमधून तब्बल ४२ लाख ५४ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एम.एच-१५,जीव्ही-९७४१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याचा साठा मालेगाव येथून चाळीसगावमार्गे जळगावला नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी चाळीसगाव चौफुलीच्या जवळ हा ट्रक अडवून याची तपासणी केली.  यात गुटखा, सुगंधीत तंबाखू आदींचा समावेश असलेला माल मिळून आला.  याचे मूल्य सुमारे ४२ लाख ५४ हजार असून पोलिसांनी हा माल जप्त केला. यासोबत ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी  पोलिसांनी ट्रकचालक शेख हारून शेख हुसेन (वय ४८, रा. आझादनगर, मालेगाव) आणि क्लिनर मोहंमद शमीम मोहंमद सलीम (वय १९, रा. मालेगाव) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.