डॉ. अब्दुल करीम सालार खान्देश रतन पुरस्काराने सन्मानित

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने ईकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालाच्या सभागृहात खान्देश परिसरासह लोकप्रिय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार,  नगरपालिकेचे प्रथम उपमहापौर यांना खानदेश रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी विशेष अतिथी प्रोफेसर जफर शेख, खलील शेख ADI,  युनूस इलाही शेख व जिल्हा खाटीक  समाजाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, सलार यांच्या  सेवांवर प्रकाश टाकून आणि त्यांच्या प्रयत्नांचे  पूर्ण कौतुक करून त्यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुनरुच्चार केला. हा पुरस्कार माझा नसून सर्व समाज बांधवांचा आहे. असे  डॉ. अब्दुल करीम सालार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.