डी. एस. कुलकर्णी व्हेंटिलेटरवर, मात्र प्रकृती स्थिर

0

पुणे-

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी हे पोलीस कोठडीत तोल जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळते आहे.ससून रूग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. ससून रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले आहे. रूग्णालयात कुलकर्णी यांचे सीटी स्कॅन, एमआरआय करण्यात आले. मात्र त्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आहेत. तणावामुळे त्यांचा तोल गेला असा असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

शनिवारी  डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीत त्यांच्या पत्नीसह अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवारी संध्याकाळीच त्यांना पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीत त्यांची रवानगी झाल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि ते पडले अशी माहिती समोर येते आहे.

आपल्या गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांना त्यांच्या पत्नीला दिल्लीतून शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेसाठी पाच पथके तयार करण्यात आली होती.

डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी वेळोवेळी उच्च न्यायालयाकडून मुदत घेतली होती. त्यामुळे गेले काही महिने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळत होते. अखेर उच्च न्यायालयाकडून कुलकर्णी यांना देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण शुक्रवारी काढून घेण्यात आले. त्यानंतर शनिवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना पुण्यात आणण्यात आले. पुण्यात न्यायालयाने त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलीस कोठडीत डी. एस. कुलकर्णी यांचा तोल गेला ते खाली पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर सध्या ससून रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.