डीआरएम यादव यांचा सत्कार

0

भुसावळ :- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक आर. के. यादव यांना उत्कृष्ट कार्य व कुशल नेतृत्वाबद्दल रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने रेल्वेच्या एमओएच विभागातील कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आले.

तसेच या कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरपीडी मार्गाची दुर्दशा झाल्याने या भागात कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची कैफियत मांडली. डीआरएम यादव यांनी लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सैय्यद नदीम, संजय चौधरी,अजिंक्य अवरकर, गणेश कुळकर्णी,नितीन राणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.