काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी नाही; प्रकाश आंबेडकर

0

15 तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार

अकोलाः- बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवार) काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा केली. 15 तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची सांगितले. काँग्रेसने दिलेले सर्व प्रस्ताव आम्हाला अमान्य आहेत. काँग्रेसला आम्ही 22 जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो त्यांनी मान्य केला नाही.

ज्या 22 जागी उमेदवार दिले आहेत, ते माघार घेणार नसल्याचं काँग्रेसला सांगितले होते. काँग्रेसने ते उमेदवार स्वीकारावेत किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी काँग्रेसने आपला एबी फॉर्म लावावा, अशी ऑफर आम्ही काँग्रेस पक्षाला दिली होती. काँग्रेस आमचे 22 उमेदवार स्वीकारण्यास तयार नाही. काँग्रेसकडून होकार न आल्यानं या चर्चा पुढे जातील, असं वाटत नाही. उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोमवारी त्यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.