गाडेगाव येथील सुप्रिम पाईप कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

जामनेर :- तालुक्यातील गाडेगाव येथील सुप्रिम पाईप कंपनीतील एच.एम.एफ विभागामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरचे काम सांभाळणारा योगेश ईश्वर महाजन (वय ३५ रा. भुसावल रोड जामनेरपुरा) याचा दि.११ रोजी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान कंपनीत मृत्यु झाला होता. मयत योगेशच्या घरच्यानाही लागलीच कळविण्यात आले नसल्याचेही नातेवाईकांकडुन सांगण्यात येत आहे. दि.१२ रोजी मयत योगेशचे प्रेत घेऊनच नातेवाईक-मित्र मंडळी कंपनीच्या आवारात गेले आणि मयताच्या परीवाराला कंपनीकडुन भरीव आर्थीक मदत घोषीत झाल्याशिवाय आम्ही प्रेत घरी नेणार नाही, असा निर्णय घेतला. अशा अचानक झालेल्या प्रकाराने कंपनी प्रशासनही चांगलेच हादरले. शेवटी दोन्ही बाजुंच्या शिष्ठमंडळाच्या व्यापक चर्चेतुन मयताच्या (योगेश महाजन) परीवाराला भरीव आर्थीक मदत देण्याचे ठरविण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, योगेश महाजन आपल्या सकाळच्या शिफ्टसाठी सकाळी कंपनीत रुजु झाला,दुपारी 3 ला पहिली शिफ्ट संपल्यानंतर योगेशने दुसरी शिफ्टही सुरू केली, आणी रविवार रात्री साडेसात-आठच्या दरम्यान जेवणाच्या सुटीत ईतरांसोबत जेवण घेऊन नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेला. काही वेळातच त्या कॉम्प्युटर रूममध्ये तो खाली कोसळलेला काही कामगारांना दिसला. त्यावेळी त्याला उलटीही झाल्याचे सांगण्यात येते. लागलीच कंपनी प्रशासनाने नेरी येथील स्थानीक डॉक्टरांना दाखवुन पुढील उपचारासाठी जळगाव हलविले. परंतु तोवर त्याचा मृत्यु झाला होता. जळगाव येथील जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे तज्ञ वैद्यकिय अधिकाऱ्यांकडुन पोष्टमार्टेम करण्यात आले. मात्र ईकडे मित्रमंडळी आणी नातेवाईकांचा संताप अनावर झाला होता. अखेर भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, नगरसेवक प्रा.शरद पाटील, बाबुराव हिवराळे, अतिष झाल्टे, सुहास पाटील, सुभाष पवार,र वींद्र झाल्टे यांच्यात व राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भ्रमणध्वनी सुप्रिम कंपनीच्या प्रशासनातील वरीष्ठ आधिकाऱ्यांशी चर्चा करून अखेर मयताच्या परीवाराला भरीव आर्थीक मदत देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर प्रेत ताब्यात घेऊन सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जामनेर येथे मृतावर शोकाकुल वातावरणात अंतीमसंस्कार करण्यात आले. कंपनी सुत्रांच्या म्हणण्यानुसार मयत योगेशचा मृत्यु हृदय विकाराच्या जबर झटक्याने झाला असल्याचे सांगीतले.मयताच्या पश्र्चात आई,वडील,गरोदर पत्नी,३ वर्षांचा मुलगा,लहान भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.