जामनेरात ग्रामपंचायत लेखा संहिता व दप्तर पुस्तकाचे प्रकाशन

0

जामनेर :- येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सुखदेवराव इंगळे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ व दप्तर पुस्तकाचे प्रकाशन पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपअभियंता जे.के.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, तहसीलदार नामदेवराव टिळेकर, संजय निकम, नंदकुमार गोराडे,संजय भारंबे, कमलाकर पाटील, अण्णा पिठोडे, गटविकास अधिकारी अजय जोशी, ईश्वर गोयर, डी.एस.लोखंडे, अशोक पालवे, अमरसींग राठोड, संजय भारंबे, एन.आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायतीचे काम करताना, किंवा तपासणी करतांना ग्रामपंचायत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना अनेक अडचणी येतात मात्र या अडचणी सोडविण्यास मार्गदर्शक स्वरूपाच्या संदर्भग्रंथाची कमी होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या संपूर्ण दप्तराबाबत एकदा संदर्भ ग्रंथ असावा असा विचार मनात आला व त्यानुसार “महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 आणि ग्रामपंचायत दप्तर “या 586 पेजेस या संदर्भग्रंथाचे लेखन व संकलन केले.

या पुस्तकात 1 ते 33 नमुने कसे भरावेत याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामपंचायत लेखा संहितेशी संबंधित 80 नियमाबाबत स्पष्टीकरणात्मक टीपा देण्यात आलेल्या आहेत.
याचबरोबर ग्रामपंचायतीने ठेवण्यासाठीच्या महत्त्वाच्या प्रशासकीय नोंदवहया जसे की आवक बारनिशी,जावक बारनिशी,शेरे बुक दवंडी रजिस्टर ,बांधकाम परवानगी रजिस्टर, मालमत्ता फेरफार रजिस्टर,अतिक्रमण नोंदवही,नाश केलेल्या अभिलेखाची नोंद वही इत्यादी रजिस्टर कसे ठेवावे याबाबतचे मार्गदर्शन केले आहे .
-मासिक सभा,ग्रामसभा,वार्ड सभा,महिला सभा घेण्या बाबत सविस्तर सूचना,तसेच आदर्श इतिवृत्त कसे लिहावे याबाबत सविस्तर माहिती;
-जन्म-मृत्यूची दप्तर कसे लिहावे, विवाह नोंदणीची दप्तर कसे लिहावे, माहिती अधिकार कायदा याबाबतचे दप्तर कसे लिहावे, महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा याबाबतचे दप्तर कसे लिहावे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याबाबतचे 7 नमुन्यात दप्तर कसे लिहावे बाबतीतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकाने सिक्स बंडल सिस्टीम (सहा संच/गठ्ठा पध्दत)मध्ये ग्रामपंचायत दप्तर कसे ठेवावे. तसेच अभिलेखाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगासाठी 5%, महिला व बालकांसाठी 10% ,समाज कल्याण साठी 15% रक्कम कशी खर्च करावे,सरपंच मानधन,कर्मचारी पगार,कर्मचारी नियुक्ती,ग्रामपंचायत सदस्य प्रवास भत्ता,ग्रामपंचायत अर्थसंकल्प, सुधारित/पुरवणी अर्थसंकल्प,अभिलेखाचे वर्गीकरण,नमुना 8 बाबत सविस्तर माहिती दिलेली असून ८० नियमावलीचा आधार या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.यावेळी श्रीकृष्ण इंगळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.श्री.इंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी तर सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.