सुजल विखेंचा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

0

मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (१२ मार्च) भाजपामध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सुजय विखेंचे नाव भाजपातर्फे खासदराकीसाठी संसदीय समितीसाठी पाठवणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.

सुजय विखे हे गेल्या अनेक दिवसांपासून नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. परंतु अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याने सुजय विखेंनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. सुजल विखेंनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. यानंतर सुजल यांनी १२ मार्च ला भाजपात प्रवेश करणार असल्याचे घोषित केले होते. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने नगरमधून कॉंग्रेसला मोठा धक्काच बसला आहे.

प्रवेशादरम्यान सुजल विखेंनी अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले, तसेच अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून याठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असेही त्यांनी सांगितले. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागल्याची खंत आहे, असंही सुजय विखे-पाटील म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.