ठेविदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0

जळगांव. दि.5-

जिल्हयात विविध पतसंस्था डबघाईला गेल्याची अनके कारणे असून ठेविदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. तसेच या पतसंस्थावर अवसायकांची नियुक्ती केल्यानंतर वसूली होउन देखिल संचालक व अवसायक यांच्यातील आपसांतील संबंधामुळे ठेविदारांना मुदत संपल्यानंतर देखिल त्यांच्या हक्काचा पैसा न मिळाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने दखल या संबंधित भ्रष्ट अधिकार्‍यांची चौकशी करून हकालपट्टी करून ठेविदारांना न्याय द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष दिलीप सूरवाडे, एस.पी नारखेडे, आदी पदाधिकार्‍यासह ठेविदार महिला वयोवृद्ध पुरूष आदी उपस्थित होते. जिल्हयातील अनेक पतसंस्थापेकी बहुतांश पतसंस्था विविध कारणास्तव डबघाईला गेल्याने त्यांचेवर नियुक्त करण्यात आलेले अवसायकांनी पतसंस्था व सभासद यांच्या हिताचे निर्णय घेवून ठेविदारांचे ठेवी रकमा परत करण्यात आलेल्या नाहीत सहकार विभागातील या सर्व अधिकारी कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा ठेविदारांकडून प्रतिकात्मक स्वरूपात प्रति ठेविदार एक रूपया भिक मागून मुख्यमंत्री यांना मनीऑर्डर करून पाठवण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.