दहावी हिंदीच्या पेपरला कॉपी प्रकरणी 23 विद्यार्थी डिबार

0

जळगांव,दि.5-
राष्ट्रभाषेचा दर्जा असलेल्या दहावीच्या हिंदी भाषेच्या पेपरला देखिल कॉपीचा महापूर दिसून आला. या कॉपी प्रकरणी मंगळवार 5 रोजी हिंंदी भाषेच्या पेपरला एकुण 23 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यातील 19 विद्यार्थी हे रावेर तालुक्यातील आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या पथकाने जळगांव शहरातील खुबचंद सागरमल विद्यालय येथे 2 तर बी, झेड उर्द्ु विद्यालय येथे 2 तर डाएटचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांच्या पथकाने नुतन माध्यमिक विद्यालय चिनावल ता रावेर येथे 2, तर डॉ. मंजुषा क्षीरसागर यांच्या पथकाने सरदार पटेल विद्यालय ऐनपुर ता रावेर येथे 16 असे एकुण 23 विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी डिबारची कारवाई करण्यात आली, विद्यार्थी व पालकांना वेळेावेळी कॉपी व भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा देवून गुणवत्तेचा दर्जा कायम
ठेवावा असे आवाहन केले असले तरी बहुतांश शाळकरी विद्यार्थ्यांचे मित्रच कॉपी पुरविण्यात आघाडीवर दिसून येत आहेत असे शिक्षण विभागाच्या सुत्रांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.