जो सरकार निक्कमी है, उसे बदलनी है!…..किसान मोर्चेत भाजपची घोषणाबाजी

0

जळगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्‍वात जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते.

भाजपतर्फे करण्यात आलेल्‍या आंदोलनाद्वारे प्रामुख्याने पिक विमा योजनेचे निकष त्वरीत बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, कापूस खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करावी; यासारख्या मागण्या करण्यात आल्‍या. याकरीता भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयवर किसान मोर्चा काढला.

सरकारविरोधी घोषणाबाजी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, केळी पिक विम्याचे निकष त्वरीत बदला, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळालाच पाहिजे, जो सरकार निक्कमी है, वो सरकार बदलनी है! अशा राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी आमदार गिरीश महाजन म्हणाले, की राज्य सरकारने पिक विम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. राज्यातील हे सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत असल्‍याचा आरोप त्यांनी केला. खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील मंत्र्यानी केंद्रांतील शासनाने जो आदेश काढला आहे. त्याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राने केळी पिक विम्याबाबत काय अध्यादेश काढला आहे. त्याचा आभ्यास करण्याचे अवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.