जिल्ह्यात आज ३९ नव्या रुग्णांची नोंद ; दहा तालुके निरंक

0

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात आज दिवसभरात  ३९ नवे रुग्ण आढळून आले, तर ५३  बरे झाले. दरम्यान,  जिल्ह्यात दहा तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर –११, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ- १९ अमळनेर- ००, चोपडा-०२, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ५८९ पर्यंत पोहचली असून ५१ हजार ७६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२७२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ५५७ रुग्ण सध्या उपचार घेताय. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९६.५९ वर गेला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.