जैन इरिगेशनच्या पाईपलाईनद्वारे सुप्रिम कॉलनीसाठी पाणीपुरवठा –आ.राजूमामा भोळे

0

जळगाव । शहराला पुरवठा करण्यात येणार्‍या वाघूर पाणीपुरवठ्याचा आढावा दि.२४ रोजी आमदार राजूमामा भोळे व अभियंता खडके यांनी घेतला. दरम्यान यावेळी सुप्रिम कॉलनीसाठी एमआयडीसीतून जैन इरिगेशनची खासगी असलेल्या पाईनलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे आ. राजुमामा भोळे यांनी सांगितले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात आजरोजी 15 ते 17 टक्के पाणी साठा शिल्क राहिला असल्यामुळे हा पाणीपुरवठा शहरवासीयांना कसा पुरवण्यात येईल, याबाबत आढावा घेण्यात आला. त्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील त्यावर विचार करण्यात आला.

सुप्रिम कॉलनीसाठी एमआयडीसीतून पाणी उचलने महापालिकेस खर्चिक पडणार आहे. कारण पाणी उचलण्याचा वेगळा रेट असतो. हा ग्रामीण एरिया आहे. त्यामुळे यास कमीतकमी दराने पाणी उचलण्यात येईल. जैन इरिगेशनची खासगी पाईपलाईन आहे. याद्वारे कमी रेटचे धोरण ठरवून सुप्रिम कॉलनीस पाणीपुरवठा करण्यात येईल. याबाबत जैन इरिगेशनशी बोलणेही झालेले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान शहरातील विविध भागांमधील 100 कोटीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर तीही कामे लवकरच मार्गी लावू, या कामांची इस्टिमेटही तयार आहे. काही दिवसातच ही कामे होतील, असेही आ. भोळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.