पारोळा येथून भर दिवसा दुचाकीची चोरी

0

पारोळा (प्रतिनिधी) येथील मोठा महादेव चौकातील मोरफळ गल्लीतून भरदिवसा दुचाकी मोटरसायकल चोरी झाल्याची घटना दिनांक १८ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत पारोळा येथील पत्रकार अभय साहेबराव पाटील यांची फॅशन प्रो काळ्या रंगाची एम एच १९ ए एफ 36 61 ही १८ हजार रुपये किमतीची दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून याबाबत पारोळा पोस्टेला अभय साहेबराव पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बापूराव पाटील हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.