जेवत असताना राणेंना पोलिसांनी धक्काबुक्की करत केली अटक; प्रसाद लाड यांचा आरोप (व्हिडीओ)

0

संगमेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं सांगत एक व्हिडीओही दाखवला आहे.

 

*फेसबुक लिंक👇*
https://www.facebook.com/watch/?v=377625743773495

राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.

युट्यूब लिंक👇*
https://youtu.be/BOj82ltIeoM

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयात होते. त्यावेळी दुपारचं जेवण करत असताना रत्नागिरी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षकही  राणेंना अटक करण्यासाठी स्वत: आले होते. पोलिसांनी राणे यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु केली. त्यावेळी राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडे अटक वॉरंट दाखवण्याची मागणी केली. त्यावेळी राणे साहेब जेवण करत आहेत, असं पोलिसांना निलेश राणे सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वत: राणेही जेवता जेवता उठून उभे राहल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. साधारण एक मिनिटाचा हा व्हिडीओ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.