जुन्या भांडणामुळे तिघांनी एकाचे डोके फोडले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील तांबापुराजवळ असलेल्या मच्छीबाजार परिसरात उधार पैसे न दिल्याने आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाचे डोके फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

संजय इच्छाराम पाटील (वय ४७, रा. सुप्रीम कॉलनी)  हे दि.५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास मित्र अनिलसोबत मच्छीबाजार परिसरात नाश्ता करण्यास गेले होते. दोघे उभे असताना ईश्वर, पिन्या आणि आणखी एक जण त्याठिकाणी आला. तू तुझी गाडी विकल्यावर आलेल्या पैशातून इतरांना पैसे दिले पण मला उधार पैसे दिले नाही. तू माझ्या भावाला पण शिवीगाळ केली.

अशा मागील भांडणाच्या कारणावरून ईश्वर याने मारहाण करत लाकडी काठीने संजय यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केली. इतरांनी देखील चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. संजय हे रक्तबंबाळ झाल्याने अनिल याने वाद सोडवित त्याला दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.