जीएसटी च्या माध्यमातून रोजगाराच्या भरपूर संधी आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा-अनंत राख

0

भुसावळ (प्रतिनिधी) :  येथील श्रीमतीी प क कोटेचा महीला महाविद्यालयात वस्तूू व सेवा कर या विषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेल उद्घाघाटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे जळगाव येथील जॉईंट कमिशनर अनंत राख सर व प्रमुख पाहुणेेे म्हणून जळगाव जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर संघाचेे अध्यक्ष मगन पाटील, मुकेश अग्रवाल सर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ मंगला साबद्रा आणि वाणिज्य विभाग प्रमुख राजकुमार गजरे ,उपप्राचार्य शिल्पा पाटील, जनार्दन धनवीच, महाविद्यालयातील प्राध्यापक परिसरातील सीए, एम. बी. अग्रवाल जिल्हा व्यापाारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, संस्थेचे संचालक प्रशांंत अग्रवाल उपस्थित होतेे. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप  प्रज्वलनाने अतिथींच्या हस्ते झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार गजरे यांनी केले. उद्घाटक  अनंत राख, जॉईंट कमिशनर, जळगाव ,महाराष्ट्र शासन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सहज सोप्या शब्दात जीएसटी म्हणजे सिम्पल टॅक्स अशी व्याख्या सांगितली व सरकारचे जीएसटी हेबाळ अजून अडीच वर्षात रांगायला लागले आहे व लवकरच ते पळू लागेल .व यावेळी विद्यार्थ्यांसाठी जीएसटी च्या माध्यमातून कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. कारण संगणकाच्या माध्यमातून 36 प्रकारचे रिटर्न्स जीएसटी फाईल करताना भरावे लागतात. व व्यापारी वर्ग जवळ असणाऱ्या वेळेच्या कमतरतेचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्यासाठी करावा असे सांगितले.

तसेच बीजभाषक सीए मगन पाटील सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जीएसटी हे सरकारचे अडीच वर्षाच्या मात्र वात्रट बाळ म्हणून करून रिटर्न फाईल करताना येणाऱ्या अडचणी चा उल्लेख केला व या अडचणी सुलभकशा होतील याकडे माननीय कमिशनर साहेबांचे लक्ष वेधले. त्यानंतर सीए मुकेश अग्रवाल यांनी जीएसटी मध्ये करिअर करण्यासाठी फक्त तीन गोष्टी गोष्टींची आवश्यकता असल्याचे सांगितले त्या म्हणजे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी, संगणक कौशल्य ,व जीएसटी कोर्स केलेला असला पाहिजे त्याबरोबरच त्यांच्या संपर्कातील काही बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांची उदाहरणे दिली की जे मासिक 50 हजार ते ऐंशी हजार फक्त जीएसटी रिटर्न फाईल करून कमवत आहेत.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ मंगला साबद्रा यांनी उपस्थित पाहुणे संचालक सीए व्यापारी व प्राध्यापक व विद्यार्थी व वर्गाचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध इको-फ्रेंडली उपक्रमाची माहिती व संपूर्ण भारतातील विद्यापीठांमध्ये सर्वात अगोदर जीएसटी कोर्स  सुरू करण्यामागचा उद्देश सांगितला व या माध्यमातून कुशल रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी जीएसटी कोर्स घेणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान देण्याची विनम्र मागणी कमिशनर साहेबांच्या माध्यमातून भारत सरकारकडे करावी असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सीए साहेबराव पाटील जळगाव यांनी जीएसटी मधील रिटर्न्स आणि पेनल्टी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .द्वितीय सत्र मुकेश अग्रवाल यांनी कन्सेप्ट ऑफ सप्लाय अंड आयटीसी गेम चेंजर या विषयावर मार्गदर्शन केले व भविष्यात कर संकलनात होणारे बदल विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्यासाठी कशाप्रकारे महत्व महत्त्वपूर्ण राहतील याबद्दल मार्गदर्शन केले तिसरा व अंतिम सत्रात सीए दर्शन जैन जळगाव यांनी इम्पॅक्ट ऑफ जीएसटी ओन इकॉनोमी या विषयावर मार्गदर्शन करून अर्थव्यवस्थेत जीएसटीमुळे होणाऱ्या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यात आली.

या कार्यशाळेला 60 विद्यार्थिनींचा सहभाग होता.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सीए मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जीएसटी कोर्स करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार समन्वयक सुरज हेडा यांनी केले व सूत्रसंचालन अक्षरा साबळे व दिक्षिता साळुंके यांनी केले सदर कार्यक्रमाला नीता चोरडिया , व्ही. एस .पाटील, एस एस पाटील, आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते.व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.