चितोडे वाणी समाजातर्फे कोजागिरी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

जळगाव | प्रतिनिधी 

जळगांव शहरातील चितोडे वाणी समाजाचा कोजागिरी निमित्ताने सांस्कृतिक व स्नेहमिलन कार्यक्रम दि.१२ आक्टोंबर २०१९, शनिवार रोजी संध्याकाळी ६ ते १० दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. सदर कार्यक्रमात शैक्षणिक /सांस्कृतिक /क्रिडा/सामाजिक इत्यादी क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी  व नागरीकांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच भूलाबाई महोत्सव निमित्त भूलाबाईचे गाणे सादरीकरणाची संधी महिलांना मिळणार आहे. कमीतकमी चार किंवा त्यापेक्षा जास्त महिला/पुरुष (मुले, मुली, लहान मोठे सर्व स्री किंवा पुरुष  )भूलाबाई चे गाणे सादर करु शकतील. उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्या गटास गौरविण्यात येईल. तसेच ६ ते १५ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी फँन्सीड्रेस सादरीकरणाचे आयोजन करण्यात येऊन उत्कृष्ट फँन्सीड्रेसला गौरविण्यात येईल. सदर कार्यक्रमाच्या शेवटी दुग्धप्राशन आणि पावभाजीची व्यवस्था करण्यात आली आहे.  जळगांव शहरातील चिवासबांधवांना विनंती करण्यात येते की आपली सहकुटुंब आणि आलेल्या पाहुण्यासह उपस्थिती प्रार्थनीय व अनिवार्य आहे. असे आवाहन जळगांव शहर चिवास  कार्यकारणीने केले आहे.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक/सांस्कृतिक/क्रीडा/सामाजिक क्षेत्रातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व नागरीकांनी आपली गुणपत्रक/प्रमाणपत्र यांची पालक अथवा स्वयंसाक्षाकीत झेराक्स प्रत १)श्री विनोद अजनाडकर, महाबळ२)अँड मंजू वाणी,नवजीवन मंगलकार्यालयासमोर ३) वंदना गडे, ख्वाजामिया चौक यांचेकडे जमा करावीत.

भूलाबाईची गाणी सादर करण्यासाठी आणि फँन्सीड्रेस साठी अँड मंजू वाणी आणि वंदना गडे यांचेकडे आपली नावे दि.५ आक्टोबर  पर्यंत द्यावीत.
कोजागिरी कार्यक्रमाचे ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल सभागृह(लेवा भवन), आंबेडकर मार्केट जवळ जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.