शेतात कपाशी वेचना-या महिलेचा विनयभंग

0

प्रतिनिधी | एरंडोल 

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे २८ वर्षीय महिला तिच्या शेतात कपाशी वेचत असतांना आरोपी भगवान माधवराव महाजन याने तिचा विनयभंग केला.हि घटना पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान आरोपी भगवान महाजन हा फरार असल्याची माहिती एरंडोल पोलीस सूत्रांनी दिली.

याप्रकरणी एरंडोल पो.स्टे.ला पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.का.भिमराव मोरे,अमित तडवी,श्रीराम पाटील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.