जिल्ह्यात आज ८६१ नव्या रुग्णांची नोंद ; ८०० कोरोनामुक्त

0

जळगाव । जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नव्या बाधित पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र आज बाधित रुग्ण अधिक आढळून आले असून आज ८०० रुग्ण बरे झाले असून ८६१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. मात्र. जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरूच आहे.  आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २८ हजार १७२ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १६ हजार २७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २३०४ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ९५९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.७२ टक्क्यांवर पोहचले आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १२७, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १०६, अमळनेर ३६, चोपडा ४७, पाचोरा २८, भडगाव ०७, धरणगाव १५, यावल २४, एरंडोल २४, जामनेर १०५, रावेर ७०, पारोळा ३५, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ८१, बोदवड ३६, अन्य जिल्ह्यातील २१.

Leave A Reply

Your email address will not be published.