भडगाव येथील बंद आठवडे बाजारात नागरिकांची तोबा गर्दी !

0

भडगाव प्रतिनिधी  : आज (दि७) शुक्रवारी येथील आठवडे बाजार भरतो, मात्र कोरोना मुळे बाजार सद्या बंद असले तरी गर्दी मात्र कायम पाहायला मिळाली. सकाळी ७ ते ११  दुकाने खुले राहतात. त्याचा फायदा घेत आज शुक्रवार  बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली . यावेळी सोशलडीस्टन्स चे नियम धाब्यावर बसवून बेजबाबदारपणे नागरिक  हिंडतांना आढळून आले . पोलीस व पालिका पथक फिरत असले तरी त्यांना न जुमानता नागरिकांची ही गर्दी कोरोना च्या वादळा पूर्वीची शांतता की, नवे वादळ तयार करणारी म्हणावी हे येता काळ ठरविलं.  मात्र आज नियमितपणे नागरिकांनी बाजाराचा मौज घेतलेली दिसतोय.

प्रशासनाला गर्दी पांगवावी लागणार :- 

पुढील आठवडे बाजार शुक्रवार येण्या आधीच गर्दीवर आवर म्हणून प्रशासनाला येथील अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, अन्य दुकाने यातील सोशल डिस्टन्स ठेवावा लागेल . जेणे करून गर्दी होणार नाही व रोगाला आमंत्रण टाळता येईल.

इंग्रजी इंटरनॅशनल ते गाव पातळीवरील शाळांचे कपडे गल्लीबोळातून विक्री :- 

इंग्रजी इंटरनॅशनल ते गाव पातळीवरील शाळांचे कपडे गल्लीबोळातून विक्री होत आहे. इंग्रजी व मराठी मध्यम शाळा बंद असून विद्यार्थ्यांची कपडे शाळांमध्ये किंवा दुकानात पडून आहेत . कपड्यावरून ही कोरोना होतो त्यामुळे शासनाने कापड दुकाने बंद ठेवली आहे. अशात अडकलेल्या पैशांचे भांडवल करून घेण्यात काही संस्था, शाळा व दुकानदार लागले आहेत. शासकीय सर्व नियम तुडवड अशा पध्दतीने हाथ विक्री सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.