शेंदुर्णीत 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ

0

 शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी : शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम यांच्या नेतृत्वात 18 वयोगटातील तरुणांना लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ तालुक्यातून सर्वप्रथम शेंदुर्णी तुन करण्यात आला .

याबाबत सविस्तर वृत्त असे की   18 वर्षे वयोगटातील पासून 44 पर्यंतच्या नागरिकांना लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड  यांनी लसीकरण केलेल्या तरुणांना  पुश व गुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले, तसेच लसीकरण मोहिमेत सर्व वयोगटातील तरुण आबालवृद्ध यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवून मोहीम यशस्वी करावी. गावा बरोबर देश करुणा मुक्त करावा लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे असे आव्हान त्यांनी या वेळी केले. आज दिवसभरात बुकिंग नुसार 45 वरील 272 नागरिकांनी लसीकरण करून घेतले. अठरा वरील वयोगटात 120 नागरिकांना लसी देण्यात आल्या.

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय गरुड जिनिंग-प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन दगडू पाटील  .रवींद्र गुजर वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम, डॉ शुभम सावळे, गजानन माळी, शोभा घाटे, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील ,डी.एम. मुर्तडकर, अनिरुद्ध रहाटे, गजानन बारी, किशोर कांबळे, त्रंबक तवर, ईश्वर कोळी, सुनील शिवपुजे ,सुनील लोखंडे व इतर आरोग्य सेवक कर्मचारी नागरिक उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.