मासिक पाळी आणि गर्भधारणा दरम्यान कोविड लसीकरण करावे का ! डॉ.अंजली भिरुड…

0

जळगाव:- देशामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्याचे लसीकरनाची सुरुवात झाली आहे. मुलींमध्ये वर महिलांमध्ये लसीकरणाबाबत काही अफवा पसरत आहे. जशा कि मासिक पाळीच्या काही दिवस आधी मासिक पाळी मध्ये व मासिक पाळी नंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते म्हणून लसीकरण करू नये पण खरं तर या अफवा आहेत. सायंटिफिकली अशी कुठल्याही प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती ही मासिक पाळीच्या कुठल्याही दिवशी कमी होत नसते. त्यामुळे महिलांनी व मुलींनी मासिक पाळीच्या कुठल्या दिवशी सुरक्षित रित्या लसीकरण करून घ्यावे

 प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा प्रश्न आहे.

की लसीकरण करावे की नाही करावे. तर प्रेग्नेंसी मध्ये ज्या ज्या देशांमध्ये लसीकरण करण्याचे सांगितले आहे त्या त्या देशाने त्याच्या गाईडलाईन व मार्गदर्शक सूचना दिलेले आहे पण आपल्या देशामध्ये स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय द्वारे अजून तरी तशा गाईडलाईन आलेल्या नाही

भारतामधील फॉक्सी या संघटनेने गर्भवती महिला व स्तनदा मातांची लसीकरण करावे अशा सूचना दिलेले आहे पण त्या पण आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे फायदे व तोटे समजून घेऊनच गर्भवती मातांनी लसीकरण करावे जसे की काही स्त्रियांना हायरिस्क प्रेग्नेंसी असते म्हणजे डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे थायराइड आहे अस्थमा आहे आशा महिलांना प्रायरीटी बेस वर लसीकरण करून घायला पाहजे ज्या  स्त्रिया हेल्थकेअर वर्कर आहे म्हणजे प्रेग्नेंट आहे व कोविडच्या पेशंट बरोबर काम करतात अशा स्त्रियांनी सुद्धा प्रायरीटी बसेस  वर लसीकरण करून घ्यायला पाहिजे प्रेग्नेंसी मध्ये लसीकरण करायचे म्हणून बऱ्याचश्या गर्भवतीच्या महिला घाबरता आहेत माझ्या बाळावर त्या लसीकरणामुळे काही परिणाम होईल का तर बाळाची ची जी अवयव असतात त्याला आम्ही( organogenesis)असेम्हणतो तर ते बारा आठवड्यापर्यंत पूर्ण झालेले असतात त्यामुळे गर्भवती मातांना घाबरून जायची गरज नाहीये त्यांनी बारा आठवड्यानंतर जर लस घेतली तर ते सुरक्षितच असणार आहे.

स्तनदा मतांनी सुद्धा डिलीवरीच्या सहा आठवड्यांनंतर लसीकरण करून घ्यायला पाहिजे ते सुरक्षित असनार  आहे काही  गर्भवती महिलांची आहेत त्या घाबरलेल्या आहेत किंवा लसीकरण मुळे आम्हाला साइड इफेक्ट तर नाही  कीव्हा मला ॲडमिट व्हावं लागेल का वगैरे तर तसं काही नाही आहे साधा फ्लिऊ सारखा आजार त्यांना होऊ शकतो आणि ते लगेच बरे होऊ शकतात काही स्त्रियांनी जर लसीकरण घेतली व त्यांना कळले की आम्ही प्रेग्नेंट आहे तर त्यांनी सुद्धा गर्भ वाढवायला हरकत नाही व ज्या स्रिया वंध्यत्वावर ट्रीटमेंट घेत आहे तसे मेडिसिन च्या स्वरुपात  त्यां सुद्धा आपली ट्रीटमेंट लांबून नये त्या लसीकरनबरोबर आपली ट्रीटमेंट  पूर्ण करू शकतात घाबरायची गरज नाही लसीकरणाबाबत माझ्या सर्व महिलांना व मुलींना विनंती आहे की त्यांनी लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व स्वतःचे संरक्षण करावे

– डॉ. अंजली भिरुड

स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ,  जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.