जिल्हा समता शिक्षक परिषदेच्या पूर्व विभाग जिल्हअध्यक्षपदी मनीषा देशमुखांची निवड

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

14 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव जिल्हा आयोजित मेळाव्यात पुर्णाड तालुका मुक्ताईनगर गावच्या सरपंच तसेच हिंदी सेवा मंडळ द्वारा संचालित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ येथील प्राध्यापिका सौ. मनिषा देशमुख यांची जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी (पूर्व विभाग) निवड करण्यात आली.

याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, विस्तारअधिकारी रागिनी चव्हाण व शिक्षण विस्ताराधिकारी खलील शेख, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे समता परिषदेचे राज्य प्रदेशअध्यक्ष आप्पासो भरतजी शिरसाठ, प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांतजी गरुड, राज्य सदस्य डी.एम. मोतीराय , कास्ट्राईबाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, राज्यउपाध्यक्ष रावसाहेब जगताप, विभागीय अध्यक्ष बी.एन. पाटील महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा छाया बैसाने, सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी कोळी, गणेश बच्छाव, भैय्यासाहेब सोनवणे हे प्रमुख उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.