मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाचे सूर घुमलेː खा. राजन विचारे

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाण्याचे हृदय असलेल्या मासुंदा तलावातील तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाचे सूर घुमले. प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, पं. संजीव अभ्यंकर, आनंद भाटे व मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या स्वरांनी ठाणेकर मंत्रमुग्ध झाले. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मासुंदा तलावासाठी साकारलेल्या  अ‍ॅम्पी थिएटरचा लोकार्पण सोहळा दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला.

या कार्यक्रमासाठी शास्त्रीय संगीतकार यांच्या सुरांच्या जुगलबंदीचा आस्वाद ठाणेकर श्रोत्यांनी घेतला. संपूर्ण अ‍ॅम्पी थिएटर गर्दीने तुडंब भरले होते. या कार्यकमाची पावसाच्या हजेरीने सांगता करण्यात आली. खासदार राजन विचारे यांनी या अ‍ॅम्पी थिएटरवर उपस्थित असणाऱ्या संगीत श्रोती ठाणेकरांचे आभार मानले व या व्यासपीठावर असेच नवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे खा. विचारे यांच्याकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.