जिओकडून नवीन ऑल इन वन रिचार्ज प्लॅन्स सादर ; जाणून घ्या नवे दर

0

मुंबई : एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने नवे दर लागू केल्यानंतर आता रिलायन्स जिओनेही आपले नवीन ऑल इन वन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. ६ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे. जिओने १९९ ते २१९९ रुपयांदरम्यान विविध प्लॅन सादर केले आहेत. यात २८ दिवसांच्या वैधतेपासून एक वर्षापर्यंत वैधता असलेल्या प्लॅन्सचा समावेश आहे. दरम्यान, रिलायन्स जिओच्या या प्लॅन्समध्ये सुमारे ४०% दरवाढ झाली असली तरी, इतर कंपन्यांच्या तुलनेत हे दर २५%ने कमी आहेत.

जाणून घ्या नवे प्लॅन –

28 दिवस वैधता :
199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅपचं सब्स्क्रिप्शन मोफत.
249 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅपचं सब्स्क्रिप्शन मोफत.
349 रुपये- दररोज 3 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत.

56 दिवस वैधता :
399 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत.
444 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत

84 दिवस वैधता :
555 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत.
599 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत.

365 दिवस वैधता :
2,199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्स्क्रिप्शन मोफत.

Leave A Reply

Your email address will not be published.