जात वैधताप्रमाणपत्राची जबाबदारी महाविद्यालयांवर

0

जळगांव,दि.9-
विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्तीसाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ते बहुतांश वेळा पालकांकडून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सूद्धा कार्यालयीन दिरंगाईमुळे पुर्तता होत नाही परीणामी विद्यार्थी विविध शैक्षणिक शिष्यवृत्त्यापासून वंचीत रहाण्याची ओरड होते त्यामुळे दहावी, बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारे जातवैधता प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी शाळा, महाविद्यालयांवर सोपवली असून या संदर्भात शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
महाविद्यालयांत बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. प्रवेश प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत विद्यार्थी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्जांमुळे विद्यार्थ्यांची घाई होते आणि व्यवस्थेवरही ताण येतो. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. प्रमाणपत्र सादर करण्याच्या हमीवर प्रवेशांमुळे अनेकदा गोंधळ होते.
विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे प्रमाणपत्र काढण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे. अकरावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी महाविद्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.