बेशिस्त वाहतुक, वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन

0

सायंकाळनंतर गल्लीबोळात सार्वजनिक ठिकाणी तळीरामांची भरते शाळा

जळगांव, दि. 10 –
शहरात चौकांचौकात वाहतुक नियंत्रणासाठी पशासनातर्फे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असून देखिल दुचाकी, तीनचाकीसह वाहनचालकांकडून थेट वाहतुक नियंत्रण कर्मचार्‍यांसमोर बिनदिक्कत लाल सिग्नल असतांना देखिल सर्रास वाहतुक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. कोर्टचौक वगळता अन्य चौकाचौकात कर्मचारी असून देखिल नसल्यासारखेच चित्र दिसून येत आहे तर काही ठिकाणी नावालाच कारवाई केली जाते. या कारवाईत बहुतांश वेळा महाविद्यालयीन युवती, चाकरमानी महीलावर्ग अथवा कामानिमित्त दुचाकीवर जाणार्‍या अनावधानाने वाहनचालविण्याचा परवाना सोबत न बाळगल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाईला बाहेरगावाहुन येणारे वा परजिल्ह्यातील दुचाकीचालक सामोरे जात असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी शैक्षणिक हब, नामांकित 10,.वी 12चे ट्युशन कोचींग क्लासेस, शाळा महाविद्यालयांचे परीसर, शासकिय कार्यालयांचे परीसर अशा अनेक सार्वजिनक ठिकाणी शैक्षणिक वा कार्यालयीन कामानिमित्त अनेकांची वर्दळ दिवसभर सुरू असते. शहर परीसरात कोर्ट चौकासह अन्य ठिकाणी चौकाचौकात वाहतुक नियंत्रणासाठी स्वयंचलित वाहतुक नियंत्रण सिग्नल यंत्रणा आहे. तर काही ठिकाणी कर्मचारी देखिल नियुक्त आहेत. परंतु कोर्ट चौक वगळता कोठेही वाहतुक कर्मचारी जागेवर कधीही दिसून येत नाही. भर दुपारी 11.30 ते 12.30 च्या दरम्यान वा सायंकाळी 5 वाजेनंतर बर्‍याच शाळा महाविद्यालयांसह कार्यालयीन कर्मचार्‍यांना घरी जाण्याचे वेध लागलेले असतात नेमक्या अशा गर्दीच्या वेळी स्टेट बँक, स्टेडिअम चौक, टॉवर चौक वा महामार्ग चौफूलीवर कर्मचारी असून देखिल बरेच वाहन चालक वाहतुक सिग्नल लाल असतांना सुद्धा सिग्नल हिरवा होण्याची वाट न पहाता सर्रास भरवेगात नेउन शर्यत जिंकल्याच्या अविर्भावात वाहतुक नियमांचे उल्लंघन करण्यात धन्यता मानतात. ला.ना,.आर,आर.,महिला महाविद्यालय आदी ठिकाणी शाळा सुटल्यानंतर महिला महाविद्यालयाच्या बाहेर महाविद्यालयाशी संबंध नसलेल्या टवाळखोरांची दुचाकीवर धुमस्टाईल वाहन चालवून अनेकांचा जिव धोक्यात आणत असल्याचे चित्र आहे.
तत्कालीन पोलीस अधिकक्षकांनी निर्भयापथक नेमले होते. शिवाय डिवायएसपी सांगळे यांचा दरारादेखिल वेगळाच होता. निर्भया पथकाचे कर्मचारी शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस वा अन्य वेळेस देखिल ठिकठिकाणी गस्त घालित असे यानिमित्ताने या धुमस्टाईल टवाळखोरांवर काहीसा वचक निर्माण झाला होता.परंतु गेल्या काही महिन्यांपुर्वी नवनियुक्त पोलिस अधिक्षकांनी पदभार घेतल्यानंतर सद्यस्थितीत निर्भया पथक देखिल कोठे दिसेनासे झाले आहे. तर स्टेट बँक स्टेडिअम चौकात बेफाम वाहन चालकांकडून सर्रास वाहतुक नियमांचे उल्लंघन केले जात असलेचे चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.