जाणून घ्या.. जळगावातील आजचे सोने- चांदीचे दर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वायदा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होतो. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव तोळ्यामागे 0.18 टक्क्यांनी घसरला. तर चांदीचा भाव मात्र 0.34 टक्क्यांनी वधारला.

मागील काही दिवसात  सोन्याच्या भावाने 500 रुपयांची उसळी घेत एका महिन्यातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. परंतु, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर पुन्हा खाली आला आहे. त्यामुळे एक तोळा सोन्याची किंमत 47,440 रुपये इतकी झाली आहे. तर चांदीचा भाव 221 रुपयांनी वाढून 65,430 च्या पातळीवर पोहोचला आहे.

जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोन्याचे दर 47500 रुपये आहे,  तर आज चांदीचे दर  67500 रुपये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.