जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिक्तपदांसाठी मागविले अर्ज

0

जळगाव

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्तपदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाविद्यालय व रुग्णालय आस्थापनेवरील दैनंदिन रुग्णसेवेच्या दृष्टीने अचिकित्सालयीन  व चिकित्सालयीन विषयातील सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त असलेली पदे १२० दिवसांच्या कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अधिष्ठाता कार्यालयात सूचनाफलकावर लावण्यात आली आहे. ७ जुलै अर्ज मागविण्याची अंतिम तारीख असून प्रत्यक्ष मुलाखत ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १७ विषयांच्या ३१,  वरिष्ठ निवासी पदाच्या ११ विषयांच्या २५ तर ९ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.