जळगाव जिल्ह्यात आज केवळ १५ नवे रुग्ण ; ११ तालुके निरंक

0

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात आज तब्बल चार महिन्यानंतर नवीन रुग्ण संख्या २० च्या आत आढळून आली आहे. आज दिवसभरात केवळ १५ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ६० कोरोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून आज तब्बल ११ तालुके निरंक आहे.

जिल्ह्यात आज १५ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ३०९ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ०७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २५७० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६६४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

 असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-०५, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.