जळगाव आणि चाळीसगाव शहरातच फक्त कोरोना रुग्ण

0

कोरोनाचा वेग मंदावला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात फक्त ०४  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १०  जणांनी कोरोनावर मात केली आहे .

कोरोना रिपोर्टनुसार जळगाव शहरात  आणि चाळीसगाव शहरात दोन – दोन  असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित सर्व तालुके निरंक आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 10 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 139949 रूग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात सध्या 77 अॅक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 4 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 142601 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात बाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद नसून आतापर्यंत 2575 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.