जळगावात 32 वर्षे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव;-एका 32 वर्षीय परप्रांतीय तरुण कामगाराने राहत्या घरात तील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी 30 जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुमारास तालुक्यातील रायपूर कंडारी येथे उघडकीस आले असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) रा. दरबंगा, बिहार ह.मु. रायपूर कंडारी ता.जि.जळगाव असे मयत  परप्रांतिय तरूणाचे नाव आहे.

याबाबतमाहिती अशी की, गोविंदकुमार पासवान हा तरूण मामा अर्जून कुमार यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून  तालुक्यातील रायपुर कंडारी येथे मोहन परदेशी यांच्या घरात भाड्याच्या खोलीत राहायला होता. गोविंदकुमार पासवान हा एमआयडीसीतील इंडो ऑईल प्रोटीन फूड या खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. सोबत राहणारे मामा अर्जून कुमार यांची रात्री पाळी असल्याने ते शनिवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता कंपनीत कामाला निघून आले. त्यानंतर गोविंदकुमार हा घरी एकटाच होता. मध्यरात्री गोविंदकुमार याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ वाजता मामा अर्जूनकुमार हे घरी आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर गोविंदकुमार याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थ व इतरांना दरवाजा तोडून आत प्रवेश करत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.