जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खून; डोके ठेचून केली हत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, खून, चोरीच्या घटना वाढतच आहेत. कालच शहरातील निमखेडी रोड परिसरातील खुनाची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा शहरात खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील रथ चौकाला लागून असणाऱ्या आंबेडकर नगराच्या बाजूच्या परिसरातील राजू पंडित सोनवणे या व्यक्तीची डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.