शाडूमातीपासून हस्तांकृत आकर्षित गणेश मूर्ती बनवणारे बालकलाकार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

टिटवाळा(मुंबई) येथे राहणारे श्री प्रदीप कमलाकर वाणी व सौ संगीता प्रदीप वाणी यांचा मोठा मुलगा हितेन प्रदीप वाणी याने यंदाही शाडूमातीपासून व कोणत्याही साच्याचा वापर न करता सुरेख, सुबक व आकर्षक २.१५ फुटाची गणेशमूर्ती साकारली आहे. त्यासाठी त्याला ५० किलो माती लागली. त्याने १० ते १५ दिवसांत रंग देऊन मूर्ती पूर्ण केली. त्याला चित्रकलेची, वाचनाची देखील आवड आहे. त्याने अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्याने गणपती डोळे इतके उभेउभ काढले की त्याच्या मनातल्या भाव-भवना श्री गणेशाच्या डोळ्यातून ओतप्रोत वाहतात.

त्याचा लहान भाऊ मनिष प्रदीप वाणी याने सुद्धा १२ इंचाची शाडूमातीपासून बालगणेशाची मूर्ती बन वली आहे. त्याला वाचन, रांगोळी काढणे, चित्र काढण्याची आवड आहे. दोन्ही भावांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवून व फुलांची आरास करून आपले हस्तांकृत गणपती विराजमान केले आहेत.  हे दोन्ही भाऊ स्व. कमलाकर शंकर वाणी (रावेर) व स्व. विश्वनाथ उर्दू वाणी (वरणगाव) यांचे नातू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.