जळगावात जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा

0

जळगाव ;- जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन ,भवरलाल अँड कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट, फोटोग्राफर असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विद्या गायकवाड, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ केतकीताई पाटील ,माजी नगराध्यक्ष कांती चौधरी ,माजी महापौर विष्णू भंगाळे ,जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवा,र राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील ,शरद तायडे राष्ट्रवादीचे अशोक लाडवंजारी मनसेचे एडवोकेट जमील देशपांडे सेना महिला आघाडीच्या महानगर प्रमुख सरिताताई माली, सुनील माळी, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर सैय्यद यांनी केले . यावेळी आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आर्ट गॅलरी साठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळावी असे गेल्या 20 वर्षा पासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना मागणी करण्यात येत असून आज पर्यंत काहीही उपयोग झालेला नाही या आर्ट गॅलरी मुळे जागतिक पातळीवर नाव आपल्या गावाचे नाव मोठे होणार असुन त्यात सगळ्या उभयतांनामदतीचे आवाहन केले फोटोग्राफर व त्यांच्या परिवारासाठी वेगवेगळ्या योजनांचे अंमलबजावणी करणार आहोत असं त्यांनी सांगितले.

मनोगत व्यक्त करताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी म्हटलं की फोटोग्राफरच्या आर्ट गॅलरी साठी जागेच्या मागणीचा विचार केला जाईल व त्यांना मध्यवर्ती ठिकाणी एक जागा देण्याचा नियोजन लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. गोदावरी फाउंडेशनच्या केतकी पाटील यांनीही विचार व्यक्त केले व जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्षीय भाषणात गुलाबराव देवकर यांनी
आर्ट गॅलरी साठी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. जळगाव शहर महानगरीच्या महापौर जयश्रीताई महाजन यांनी धावती भेट देऊन सर्व फोटोग्राफर्स ना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारुक शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश जगताप यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव धर्माधिकारी संजय वडनेरे ,जयंत पाटील ,राजू हारीमकर ,अतुल वडनेरे, बंटी सय्यद ,अकील खान ,डॉ. रिजवान शेख विशाल महाजन, प्रियंक शहा , युवराज वाघ यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.