जलवाहिनी दुरुस्तीमुळे एक दिवस पाणीपुरवठा खंडित

0
दुरुस्तीसाठी लागणार 20 तासापेक्षा अधिक कालावधी
जळगाव- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघुरच्या 1200 मीमीच्या मुख्य जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम मेहरुण परिसरातील जलतरण तलावाजवळ सुरु करण्यात  आल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी 20 तासापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात  आला आहे.
जळगाव शहराला वाघुर धरणावरुन पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून मेहरुण परिसरातील जलतरण तलावाजवळ जलवाहिनीची गळती झाली होती. 1200 मीमी  व्यासाची जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी 9 वाजेपासून हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती करताना जुना पाईप काढून नवीन लोखंडी पाईप टाकण्यात  येणार आहे. यासाठी किमान 20 तासापेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे दि.4 रोजी होणारा  नियोजित पाणीपुरवठा 5 रोजी होईल. 5 रोजी होणारा 6 तर 6 रोजी होणारा पाणीपुरवठा 7 रोजी होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी  दिली.
5 रोजी होणारा पाणी पुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड,  मोहनगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल, पिंप्राळा गावठान, गायत्रीनगर, नूतनवर्षा नगर, शारदा कॉलनी, दांडेकरनगर,  मानराज पार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर,  योगेश्वर नगर, हिरा पाईप, शंकरराव नगर, खेडी गाव, तांबापूरा, जिल्हा रोड, रामदास कॉलनी, रायसोनगी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, जगवानी नगर, सदा शिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर.
6 रोजी होणारा पाणीपुरवठा
पिंप्राळा गावठान, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅँक कॉलनी, आशाबाबानगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी, शिंदेनगर, अष्टभुजा नगर, वाटीका आश्रम परिसर, खोटेनगरातील रा हिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, अहुजानगर, निमखेडी, संभाजीनगर, नित्यानंदनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर,  सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, भगवाननगर, रामानंद नगर, कोल्हे नगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, मेहरूण गावठाण, दत्तनगर,  लक्ष्मीनगर  इक्बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, सदगुरुनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर,
7 रोजी होणारा पाणी पुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग शनीपेठ, बळीराम पेठ, नवी पेठ, हौसिंग सोसायटी, गेंदालाल मिल, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी.पार्क., संपुर्ण रिंगरोड प रिसर, भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर,  जोशीपेठ, गणेश वाडी कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा का ॅलनी, सुप्रिम कॉलनी, तांबापूरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, वाघ नगर, हरिविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, समता नगर,  स्टेट बॅँक कॉलनी, धांडेनगर.

Leave A Reply

Your email address will not be published.