देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भाऊंच्या स्मृतिस्थळी वृक्षारोपण

0

जळगाव – राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी रात्री उशिरा भुसावळ येथे येऊन जैन हिल्सला मुक्कामी होते. आज सकाळी श्री फडणवीस यांनी जैन कुटुंबियांच्या भेटीनंतर श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जैन व्हॅली येथील भाऊंची सृष्टी या ठिकाणास भेट दिली. तेथील भाऊंचे स्मृतिस्थळ असलेल्या वाटिकेत त्यांच्याहस्ते तुळस रोप लावण्यात आले.  

यासह त्यांनी कांताबाई जैन आणि भवरलालजी जैन यांचे जैन हिल्स येथे असलेल्या  स्मृतिस्थळ श्रद्धाधामला भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,  माजी मंत्री गिरीष महाजन, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, उपाध्यक्ष अनिल जैन, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अमर जैन उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.