जम्मू-काश्मीर; चकमकीत तीन दहशतदवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासुन दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चांगलीच चकमक सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आजदेखील जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत तीन दहशतदवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. तर, तीन जवान जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळत आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस व लष्करी जवानांचे संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे. या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात जवानांना यश आले आहे. कुलगाममधील नागनाद-चिम्मर परिसरात चमकीस सुरूवात झाली आहे. या परिसरास जवानांनी वेढा दिला असून, शोधमोहीम राबवली जात आहे.

उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये काल घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत, जवानांनी एक दहशतवाद्याचा खात्मा केला होता. या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल हस्तगत करण्यात आली होती. तसेच, परिसरात आणखी दहशतवादी असल्याचा संशय असल्याने जवानांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.