म. जोतीराव फुले यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याची नासधूस करणाऱ्यांच्या निषेधार्थ भडगाव तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन

0

भडगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याची नासधूस करणाऱ्यांच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र माळी समाज महासंघ भडगाव यांच्या तर्फे तहसीलदार माधुरी आंधळे, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांना निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , काही दिवसापूर्वी दादर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृहावर भ्याड हल्ला करण्यात आला.नंतर कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले आणि आता १४ जुलै , २०२० रोजी यवतमाळ येथील आझाद मैदानजवळच्या भारतातील थोर समाजसुधारक -स्त्री शिक्षणाचे जनक – राष्ट्रपिता – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले स्मारकाच्या चबुतऱ्याची जागोजागी नासधुस केली.

महापुरुषांची विटंबना करण्याचा हा साळसूदपणे केला जाणारा प्रकार असल्याचं जाणवत आहे. यामुळे सामाजिक वातावरण दूषित करून जनमानसात संतापाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. अशा या मनूवादी विकृत प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करून कठोर शासन करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र माळी समाज  महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी विभागीय उपाध्यक्ष- सागर शिवदास महाजन, व्यापारी आघाडी अध्यक्ष – नितीन महाजन, युवक जिल्हा अध्यक्ष – देवराम निंबा महाजन,
युवक उपजिल्हाध्यक्ष – विकास महाजन,
तालुका अध्यक्ष – मनोहर महाले,
तालुका सरचिटणीस- सोनू महाजन
युवक तालुका अध्यक्ष- राहुल सुरेश महाजन,
तालुका उपाध्यक्ष- भारत गोपीचंद माळी,
ता .संघटक-नितीन शांताराम माळी, शहर अध्यक्ष-
उज्वल अनिल महाजन, शहर संघटक-
राहुल महाजन, युवक शहर अध्यक्ष-
सौरभ बच्छाव, युवक शहर संघटक-
संदीप बापू महाजन,सोशल मिडिया प्रमुख-
यश जिवन महाजन,युवक शहर उपाध्यक्ष
रोहित गोविंदा महाजन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.