जनकल्याणसाठी महापुरुषांचे अवतरण

0

महामंडलेश्वर अनुभूतानंदजी महाराज यांचे प्रतिपादन

भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते या भूमीत जिथे जिथे संत महापुरुषांचे अवतरण झाले ती भूमी पावन तीर्थ भूमी झाली .महापुरुषांचे अवतरण ही मानव कल्याणकरिता बनले आहे.या भूमीवर शंकराचार्य, स्वामी विवेकानंद,सारखे असे अनेक महात्मा या भूमीवर जन्माला आले अश्याच प्रकारे या पाल भूमीवर परम पुज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी अवतरीत झाले आणि त्यांच्या साधनेच्या ऊर्जेने या परिसरातील जनतेच्या कल्याण केले.आपल्या कार्याची सुरुवात याच भूमीवर जन्म घेऊन यालाच कर्मभूमी बनविली असे दिल्ली हुन आलेले महामंडलेश्वर स्वामी अनुभूतानंदजी महाराज यांनी पाल वृंदावन धाम आश्रमात सुरू असलेल्या तीन दिवसीय नाम जप साधना शिबिरातील दि 25 डिसेंबर रोजी परम पुज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शेकडो संत महंत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या सोहळ्यात उपस्थित असलेले मध्यप्रदेश चे खासदार नंदुभैया चोहान यांनी बापूजी शरीर रूपात जरी नसले तरी शुष्म रूपाने आपल्या जवळ उपस्थित आहे या दुर्गम पहाडी क्षेत्रामध्ये राहणार्‍या लाखो गोरगरीब यांचा जीवनमान बदलून टाकले. उजडणार्‍या बरबाद होणार्‍या परिवाराच्या जीवनामध्ये आध्यत्मिक रंग भरण्याचे कार्य केले तीच जबाबदारी श्रध्येय श्री गोपाल चैतन्य महाराज यांच्याकडे सोपवली आहे. बापूजीच्या दाखविलेल्या मार्गावर चालून समाज कल्याणाचे कार्य करीत राहू.त्यांनतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बापूजीच्या सानिध्यात राहणार्‍यांचा जीवनमान सुधरला. पुज्य बापूजिनी पाल सह देशभरातील हजारो भाविकांना एकसूत्रात आणून त्यांचा आध्यत्मिक विकास केला त्यानंतर अनिल चौधरी यांनी मला दहा वर्षांपूर्वी पासून बापूजीच्या सहवास लाभला आहे आणि बापूजिनी जनसेवेच्या कार्यात सहभागी होण्याचे मार्ग दाखविले होते.तसेच आमदार हरिभाऊ राठोड यांनी पुज्य बापूजी कडून गुरूंदीक्षा घेऊन मी समाज सेवा करण्याची प्रेरणा मिळाली .याचबरोबर पाल वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी वनव्यवस्थापन समिती अंतर्गत पाल आश्रमाला जोडणारे रस्ते भक्त निवास या करिता पंच्यात्तर लाखाचे निधी उपलब्ध करणार असल्याचे घोषणा दिली तसेच रावेर चे तहसीलदार विजय कुमार ढगे यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत गरजू कामगार यांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले व परम पुज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजिनी श्रद्धांजली अर्पित केली दीपक नगरे यांनी बापूजी आणी वन संवर्धन बाबतच्या कार्याची माहिती दिली. यासह रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, भुसावळ पोलीस निरीक्षक रामदास पवार,सह आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.