रेल्वेच्या फुकटया प्रवाशांवर प्रशासनाची कारवाई

0

दिवसभरात शेकडोच्या वर गवसले विनातिकीट, 2 लाखाच्यावर दंड : सहायक वाणिज्य प्रबंधक व विशेष पथकाची कामगिरी

भुसावळ –
रेल्वे गाड्यांमधील व स्थानकावरील पुैकट्या प्रवाशांविरुध्द व अतिरिक्त सामान घेऊन जाणाछया प्रवाशांविरुध्द आज 26 रोजी सकाळी 8 ते 4 वाजेदरम्यान वाणिज्य विभागाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईत तिकीट चेकिंग स्टाफ एन पी पवार, वी. के. भंगाळे, वाय. डी. पाठक, हेमंत सावकारे, प्रशांत ठाकूर, आर पी सरोदे, एल. आर. स्वामी यांच्यासह 42 तिकीट कर्मचारी सहभागी झाले होते.
अचानक केलेल्या या कारवाईमुळे पुैकटया प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव रेल्वे स्थानकावर सहायक वाणिज्य प्रबंधक (तिकीट चेकींग ) अजयकुमार व 63 जणांच्या विशेष पथकाने आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास या कारवाईची सुरुवात केली. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. यात आढळून आलेल्या पुैकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येवून त्यांना दंड ठोठावण्यात आला. यामोहीमेत तब्बल 506 केसेस करण्यात आल्या असून एकूण 2 लाख 6 हजार 805 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हि मोहिम सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या विशेष पथकात 42 तिकीट निरीक्षक व 21 रेल्वे सुरक्षा बलाचे सहभागी झाले होते. मोहिमेत बिना तिकीट यात्रा करणाछया 256 पुैकट्या प्रवाशांवर केसेस करण्यात आल्या. यात 96 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर अनियमित यात्रा करणाछया 245 केसेस मध्ये 1 लाख 9 हजार 555 रुपये दंड वसूल करण्यात आला. अतिरिक्त सामान घेवून जाणाछया 5 प्रवाशांकडून 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत 506 केसेस करण्यात येवून तब्बल 2 लाख 6 हजार 805 रुपयांचा दंड प्रवाशांकडून वसूल करण्यात आला.

मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या महाराष्ट्र एक्सप्रेस, देवळाली भुसावळ शटल, सचखंड, काशी एक्सप्रेस, अमृतसर, गोरखपूर कुशीनगर, अहमदाबाद हावडा, कामायनी, गीतांजली, झेलम, महानगरी, पाटलीपुत्र, हावडा पूणे, भुसावळ सूरत, भागलपूर सूरत अशा विविध मार्गाकडे जाणार्‍या प्रवासी गाड्यामधून विनातिकीट प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांविरूदध भुसावळ मंडळ रेल्वे प्रशासनाच्या 50 तिकीट तपासणी करणारे अधिकारी, 150 रेल्वे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने आज धडक कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.